शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा पंचायत राज समितीला काळे झेंडे दाखवू सकल मराठा शौर्यपीठाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:38 IST

राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर

ठळक मुद्दे: मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याची मागणी

कोल्हापूर : राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर करावी; अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा शौर्यपीठाच्या प्रसाद जाधव, राजू जाधव, जयदीप शेळके, उदय लाड यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. येथे शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्टवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह चाणक्य मार्शल आर्टस असोसिएशनचे प्रशिक्षक संदीप लाड व आंतरराष्टÑीय पदक विजेच्या खेळाडूंनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

दरम्यान, सकल मराठा शौर्यपीठातर्फे जिल्हा दौºयावर येणाºया पंचायत राज समितीला प्रसिद्धिपत्रकाद्वारे इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर धगधगत असताना ही समिती दौैºयावर येत आहे. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून, तो तातडीने सोडविण्याची गरज आहे. सरकारने या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या समितीमध्ये विविध पक्षांचे आमदार, शासकीय अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी येऊन जाहीर करावी; अन्यथा या समितीला काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आला.आंदोलनात दीपा पाटील, प्रकाश सरनाईक, बबन चावरे, राजेंद्र चव्हाण, राहुल इंगवले, शिवाजीराव लोंढे, आदी सहभागी झाले होते.मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकामध्ये शनिवारी संध्याकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी महेश जाधव, सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, अजित राऊत, विक्रम जरग, श्रीकांत भोसले, राजेंद्र चव्हाण, शरद तांबट, अशोकराव जाधव, आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण